होमपेज › Pune › आता नर्सेसनाही औषधे देण्याचे अधिकार

आता नर्सेसनाही औषधे देण्याचे अधिकार

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 17 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी

वैद्यकिय व्यवसायाची वैधानिक परिषद असलेल्या ‘मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया’ च्या ऐवजी नवीन येउ घातलेल्या ‘नॅशनल मेडिकल ऑफ कमिशन’ या विधेयकात डॉक्टरांची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या नवीन विधेयकानूसार आता परिचारिकांनाही वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना त्यांना योग्य वाटत असलेले मर्यादित औषधे देण्याचे  अधिकार देण्यात आले आहेत. हे विधेयक संसदेत पास होणे बाकी असून ते पास झाल्यानंतर व राष्ट्रपतींची सही झाल्यावर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. 

भारतात एमबीबीएस आणि आयुष डॉक्टरांची कमतरता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते देशात 1000 लोकसंख्येला एक डॉक्टर असणे आवशक असून हे प्रमाण 1600-1 असे आहे. त्यामुळे अनेक रुग्ण प्राथमिक व प्रतिबंधात्मक सेवांपासून वंचित राहतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तयार केलेल्या या विधेयकात परिचारिकांसह फार्मासिस्ट, फिजिशियन सहायक, ऑप्टिओमेट्रिस्ट व इतर काही जणांनाही हे अधिकार देण्यात येणार आहेत. तसेच जसे डॉक्टरांची नोंद ठेवणारे रजिस्टर असते तसेच या परिचारिकांची नोंद ठेवणारे एक रजिस्टर राहणार आहे.