Wed, Jul 17, 2019 18:35होमपेज › Pune › शहरातील रस्ते, घरे यांना मिळणार नंबर कोड

शहरातील रस्ते, घरे यांना मिळणार नंबर कोड

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

देशातील प्रत्येक नागरिकाला आधारकार्डमुळे एक स्वतंत्र क्रमाकांच्या (युआयडी नंबर) माध्यमातून ओळख मिळाली आहे. त्याच धर्तीवर शहरातील प्रत्येक रस्ते, गल्ल्या, घरे आणि महापालिकेच्या मिळकती यांना एक स्वतंत्र नंबर कोड मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात पत्त्यांऐवजी थेट या नंबरमुळे मिळकतींचा शोध घेणे शक्य होणार आहे.

ई-गव्हनर्स योजनेंतर्गत महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यास डिजिटल प्रॉपर्टी सर्व्हे असे या प्रकल्पाचे नाव आहे. हा सर्व्हे जीआयएस बेसवर असणार आहे. त्यानुसार प्रत्येक मिळकतीचा अद्याक्षराच्या आधारे (अल्फा निमोरिक) मिळकतींना स्मार्ट पत्त्यांचा कोड मिळणार आहे. त्यामध्ये शहरातील सर्व रस्ते, अंतर्गत गल्ली बोळातील रस्ते, घरे यांना स्वतंत्र नंबरचा कोड असणार आहे. महापालिकेच्या विविध वास्तू, रिकाम्या जागा यांनाही हा नंबर कोड मिळणार आहे. हा नंबर भविष्यात पत्ता म्हणूनच ओळखला जाईल, त्यादृष्टीने हे काम करण्यात येत आहे. 

2005 मध्ये जागतिक बँकेचा एक अहवाल आला होता, रस्त्यांचे पत्ते आणि शहरांचे व्यवस्थापन या विषयावरील हा अहवाल होता, त्यात घरांना पत्ते देणे हा अतिशय अवघड प्रश्‍न बनला आहे. शहरी भागात तर प्रश्‍न अधिक गंभीर आहे हे स्पष्ट करण्यात आले होते, त्यातून मिळकतींच्या पत्त्यांसाठी ओळख म्हणून नंबर कोड द्यायची ही संकल्पना पुढे आली. या कोडमध्ये संबंधित मिळकतीचा पत्ता, फोटो, एसटी कोड, शहराचा कोड अशी सर्व इत्यंभूत माहिती असणार आहे. हा कोड टाकल्यानंतर ही सर्व माहिती मिळू शकणार आहे. त्यासाठी महापालिका एक एजन्सी नेमणार असून ही संबंधित एजन्सी हा प्रकल्प डेव्हलप करून देणार असून या एजन्सीकडे हे सर्व अधिकार असणार आहेत. पालिकेला मिळकतकर विभागाकडून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.