Wed, Jul 24, 2019 12:05होमपेज › Pune › सोशल मीडियावरील आदेश कर्मचार्‍यांना बंधनकारक नाही

सोशल मीडियावरील आदेश कर्मचार्‍यांना बंधनकारक नाही

Published On: Dec 06 2017 9:10AM | Last Updated: Dec 06 2017 9:10AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून शिक्षक; तसेच कर्मचार्‍यांना कोणतेही लेखी आदेश न देता सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध आदेश देण्यात येतात; तसेच हे आदेश पाळले नाहीत, तर कर्मचार्‍यांना कारवाईची धमकीदेखील दिली जाते. परंतु, अशा प्रकारे अधिकार्‍यांनी दिलेले आदेश शिक्षक तसेच कर्मचार्‍यांना पाळणे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा खुलासा शासनाच्या सामान्य प्रशासनाने माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीमध्ये दिला आहे.

शिक्षण विभागात कामकाज करत असताना अधिकार्‍यांना शिक्षक, तसेच कर्मचार्‍यांना जर कोणता आदेश द्यायचा असेल, तर तो लेखी स्वरूपात देणे अपेक्षित असते. परंतु, सध्या सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे व अधिकारी तसेच शिक्षक, कर्मचारी याचा वापर करत असल्यामुळे अधिकारी सरळ  व्हॉटस्अ‍ॅप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यालयीन आदेश देतात; तसेच आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कारवाईचीदेखील धमकी देतात. अधिकार्‍यांना एखादी सभा जरी घ्यायची असली, तरी त्याच्या सूचनासुद्धा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दिल्या जातात; परंतु काही कर्मचार्‍यांपयर्र्ंत संदेश पोहचू न शकल्यामुळे कर्मचार्‍याला जर हजर राहणे शक्य झाले नाही तर अशा वेळी अनुपस्थित कर्मचार्‍यांवर कारवाई सुद्धा केली जात असल्याचे दिसून  आले. यासंदर्भात योगेश महादेव पाखले यांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडियाव्दारे दिलेले कार्यालयीन आदेश पाळणे बंधनकारक असल्याबाबतचे धोरण किंवा परिपत्रकाची प्रत मिळावी, अशी मागणी माहिती अधिकार
अधिनियमाअंतर्गत केली होती.