Fri, Nov 16, 2018 15:55



होमपेज › Pune › पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:13AM



पुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत, पंपिंग आणि स्थापत्यविषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 10 मे) बंद राहणार आहे; तसेच शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. 

पाणीपुरवठा बंद असणार्‍या भागांमध्ये पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीतील शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुं दनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नंबर 42 व 46 (कोंढवा खुर्द), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, तर वडगाव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. 

चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसरातील पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धिकरण परिसर, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड. 

नवीन होळकर पंपिंग परिसरातील विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड आणि लष्कर जलकेंद्र परिसराच्या अखत्यारीतील लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.