Fri, Jul 19, 2019 16:09होमपेज › Pune › कोरेगाव-भीमा : फौजदाराला हृदयविकाराचा झटका

कोरेगाव-भीमा : फौजदाराला हृदयविकाराचा झटका

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 23 2018 9:46AMपुणे : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर बेकायदेशिरपणे आंदोलन करुन महामार्ग बंद केल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्थानकाचे सहायक फौजदार नितीन मोहीते यांनी 9 संशयितांना अटक केली पण वरिष्ठ पोलीस निरिक्षक एम बी पाटील यांना हा प्रकार कळल्यावर त्यांनी सर्व अटक आरोपींना लाँकअप मधुन बाहेर काढले व त्या आरोपींसमोरच मोहीते यांना अर्वाच्च भाषा व अपमानास्पद वागणूक देत सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यास सांगीतले व त्यांना पोलीस कस्टडी न मागण्या चा व न्यायालयाला त्यांना जामीनावर सोडण्यास सांगावे, असा आदेश केला. या सर्व प्रकारामुळे मोहिते यांना घरी गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, अपमानास्पद वागणुकीमुळे मोहीते यांना जबर धक्का बसल्याचे नितीन मोहिते यांच्या पत्नी कल्याणी मोहीते यांनी सांगीतले.  सद्यस्थीतीत त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते, त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. 

माझ्या पतीचे काही बरे वाईट झाल्यास, वरिष्ठ पोलीस निरिक्षक एम बी पाटील जवाबदार राहतील असे कल्याणी मोहीते यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगीतले. माझे पती व मी चार महीन्या पुर्वीचे गडचिरोली येथुन तळेगाव दाभाडे येथे बदलुन आलोय, गडचिरोली येथे 4 वर्ष ईमाने ईतबारे काम केले, पाटील हे माझ्या पतीला पहील्या दिवसापासुनच त्रास देत आहेत, त्यामुळे आम्ही अतिशय कठीण परिस्थीतीत दिवस काढत आहोत. तसेच घडलेला सर्व प्रकार हा तेथील सी सी टी वी मध्ये मुद्रीत झाला आहे, असे मोहीते म्हणाल्या. सदर गुन्ह्यात अजुन बर्याच आरोपींना अटक करायची बाकी आहे, त्यामुळे मोहीते यांनी न्यायालयात अटक केलेल्या सर्व आरोपींना पोलीस कस्टडी मीळावी असा अहवाल तैयार केला, पण वरिष्ठ पोलीस निरिक्षक एम बी पाटील यांनी सदर अहवाल बदलुन आरोपींना न्यायालयात जामीन मीळण्याकरीता मँजीस्ट्रेट कस्टडी रीमांड चा अहवाल दाखल केला, असा आरोप सौ. मोहीते यांनी केला.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरिक्षक एम बी पाटील यांना विचारले असता त्यांनी असा कुठलाही प्रकार घडला नाही व मी कोणाला शिवीगाळ केली नाही, असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगीतले. कोरेगाव भीमाप्रकरणी सुदास गरूड (49), चेतन घोडके (33), सागर आगळे (34), मनीष आगळे (37), आनंद घोडके (38), संतोष थोरात (39), मजनु नाटेकर (32), अनिल डिखळे (28), प्रकाश सुडके (28, सर्व रा. निळकंठनगर, तळेगाव दाभाडे) यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.