Sat, Aug 24, 2019 23:48होमपेज › Pune › नीरव मोदीच्या जमिनीवर ताबा

नीरव मोदीच्या जमिनीवर ताबा

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:38AMकर्जत : प्रतिनिधी

पंजाब नॅशनल बँकेत 11 हजार 300 कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हिरे व्यावसायिक नीरव मोदी याची कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील जमीन स्थानिक शेतकर्‍यांनी बायका-मुलांसह जाऊन शनिवारी ताब्यात घेतली. या जमिनीमध्ये नांगरट करून तेथे शेती करण्यास सुरुवात केली.

ही जमीन ताब्यात घेण्यासाठी काळीआई मुक्ती संग्राम असे आंदोलन  करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे व तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. याशिवाय नगर येथून आलेले सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. कारभारी गवळी व जलतज्ज्ञ मिलिंद बागल यांनीही शेतकर्‍यांच्या या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. यावेळी स्थानिक भूमिपुत्र असलेले संतोष माने, जयसिंग वाघमोडे, भाऊसाहेब वाघमोडे, हनुमंत पारखे, सत्यभामा माने, अनिल खांडेकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

नीरव मोदी विदेशामध्ये पळून गेल्यानंतर सरकारने त्याच्या देशातील मालमत्तांवर टाच आणण्यास सुरुवात केली आहे. त्याची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.

 

Tags : Nirav Modi, land, Karjat, farmer,