Sat, Nov 17, 2018 18:29होमपेज › Pune › ‘ईडी’कडून नीरव मोदीची पुण्यातील मालमत्ता जप्त

‘ईडी’कडून नीरव मोदीची पुण्यातील मालमत्ता जप्त

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:55AMपुणे : प्रतिनिधी

हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या 11 हजार 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर  त्याची शनिवारी पुण्यातील मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. यात सहा निवासी मालमत्ता, दहा कार्यालये, दोन सदनिका आणि अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील 135 एकर जमिनीचा समावेश आहे.

पुण्यातील ही मालमत्ता मोदी व त्याची पत्नी अमी यांच्या नावावर आहे. मोदीची सदनिका व मालमत्ता हडपसरमध्ये आहे. त्याचा कर्जत तालुक्यात 53 एकर जागेत सौर प्रकल्प आहे. तो 70 कोटींचा असून त्यावर टाच आणण्यात आली आहे.