Wed, Apr 24, 2019 19:46होमपेज › Pune › नववर्षांनिमित्त वाहतुकीत बदल

नववर्षांनिमित्त वाहतुकीत बदल

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:19AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

नववर्षांनिमित्त शहरातील हडपसर आणि येरवडा, पुणे कॅम्प, डेक्कन भागातील रस्त्यावरील वाहनांना तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्यात आली असून  नो व्हेईकल झोनसाठी तयार करण्यात आला आहे. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली आहे. 

हडपसर वाहतूक विभागात रविवारी दि.31 रात्री सात वाजल्यापासून ते सोमवारी दि. 1 रात्री एक वाजेपर्यंत मगरपट्टा-खराडी बायपास रस्त्यावर वाहनांचे डायव्हर्जन करण्यात आले आहे. अ‍ॅमनोरा मॉल येथून बाहेर येणारी वाहने डावीकडून वळून पुढे जातील. तर खराडीकडे जाणारी वाहने मगरपट्टा मेनगेटने पुढे जातील. सिझन मॉल समोरील रस्त्यावरुन मटेरियल गेटमधून मगरपट्टा रोडकडे येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खराडीकडे जाणारी जाणारी मालवाहू हलकी आणि मध्यम वाहनांनी नोबेल हॉस्पिटलजवळून डावीकडे वळून मगरपट्ट्याच्या पाठीमागील डीपीरोडने हडपसर रेल्वे उड्डान पुलावरून पुढे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

येरवडा वाहतूक विभागात रविवारी रात्री सात ते बारा वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. खराडी बायपास चौक ते शास्त्रीनगर  चौक लूप रोडवरील शास्त्रीनगर चौक ते आंबेडकर चौक रस्त्यावर सर्व जड वाहनांना सकाळी आठ ते अकरा आणि संध्याकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत  बंदी घालण्यात आली आहे. लष्कर कॅम्प  भागातील वाहतूक वळविण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे : 

वाय जंक्शन खान्या मारुती चौकातून येणारी वाहतूक ईस्ट रस्त्याने होल्गा चौकाकडे जातील. 
व्होल्गा चौकातून प्रीत मंदीर चौकाकडे तसेच इंदिरा गांधी चौकाकडे वाहने जातील.
 लष्कर पोलिस स्टेशन चौक इंदिरा गांधी चौकातून उजवीकडे वळून लष्कर पोलिस स्टेशन चौक डावीकडून वळून तीन तोफा चौकाकडे जातील.
तीन तोफा चौकाकडे उजवीकडे वळून  एसबीआय चौकाकडे जातील.
यामाहा शोरुम कुरेशी मशिदकडून येणारी वाहतूक 15 ऑगस्ट चौकातून सुजाता मस्तानी लेन येथून पुढे जातील.
बिशप सर्कल मम्मादेवी येणारी वाहतूक बिशप सर्कल येथून गुरुद्वारा रोडने एसबीआय हाऊस येथून पुढे जातील.
नो व्हेईकल झोन (रविवारी सायंकाळी सहा ते सोमवारी पहाटे पाचपर्यंत)
फर्ग्युसन रोड गुडलक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय मेनगेट पर्यंत.
एम.जी. रोड हॉटेल अरोरा टॉवर चौक ते ट्रायलक हॉटेल चौक पुलगेट चौकीपर्यंत.
विहित वेळेपेक्षा जास्त वेळ सिग्नल सुरु ठेवण्यात येणारे  चौक
संत कबीर चौक सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत.
डॉ. बॅनर्जी चौक सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत.
जेधे चौक सोमवारी पाच वाजेपर्यंत.
मार्केटयार्ड चौक सोमवारी पाच वाजेपर्यंत.
ढोले पाटील चौक, वखार चौक, गंगाधाम चौक, नळस्टॉप चौक, सहजीवन चौक, पौडफाटा चौक, हुतात्मा चौक, कोथरुड डेपो चौक, भैरोबानाला चौक, फातिमानगर चौक, सोपानबाग चौक, रामटेकडी चौक, घोरपडी जंक्शन याठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरु असणार आहे.