Sun, Mar 24, 2019 08:48होमपेज › Pune › विद्यार्थ्यांच्या हातात पहिल्याच दिवशी नवी पुस्तके

विद्यार्थ्यांच्या हातात पहिल्याच दिवशी नवी पुस्तके

Published On: Jun 03 2018 1:18AM | Last Updated: Jun 03 2018 12:52AMपिंपरी : प्रतिनिधी 

इन्फ्रामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यामध्ये दोषींवर कारवाई होत नसल्याचा आरोप विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य संतोष सैदणकर यांनी केला आहे. त्यांचा आरोप खोटा असून या बाबत अधिकार्‍यांची चौकशी सुरू असल्याची माहिती महावितरणच्या पुणे प्रादेशिकच्या उपमुख्य जनसंपर्क अधिकार्‍यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

महावितरणने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद करण्यात आले की, भोसरी विभाग अंतर्गत नाशिक रोड शाखेच्या कार्यक्षेत्रामध्ये झालेल्या पायाभूत विकास आराखडा कार्यक्रम (इन्फ्रा) मधील कामांसंदर्भात महेश वाघमारे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने चौकशी करून त्याचा अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये नाशिक रोड शाखेच्या कार्यक्षेत्रात इन्फ्रा एक व दोनमध्ये प्रस्तावित रोहित्रांची जागा नियमाप्रमाणे मंजुरी घेतल्याशिवाय परस्पर बदलून हे रोहित्र विकासकांच्या जागेत लावल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत नाशिक शाखेचे तत्कालिन सहाय्यक अभियंता रमेश सूळ यांच्यासह भोसरी विभागामधील संबंधीत व वरिष्ठ अशा एकूण नऊ अधिकार्‍यांवर चौकशी अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आला आहे.

या अहवालानुसार दोषी आढळून आलेल्या संबंधीत नऊ अधिकार्‍यांपैकी एक अधिकारी हे अधीक्षक अभियंता दर्जाचे आहे. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याकरिता प्रादेशिक संचालक हे सक्षम अधिकारी असल्याने नियमानुसार या सर्व 9 अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया ही प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारित सुरु आहे. 

महावितरण कंपनीच्या कर्मचारी सेवा विनियमातील तरतुदीनुसार सर्व नऊ अधिकार्‍यांविरुद्ध आरोपपत्र बजावण्यात आलेले आहेत; तसेच या अधिका्र्‍यांची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी मुख्य अभियंता दर्जाच्या अधिकार्‍यांकडून खातेअंतर्गत चौकशी व सुनावणी सुरु आहे.संतोष सौंदणकर यांनी संबंधीत अधिकर्‍यांविरुद्ध कारवाई होत नसल्याचा केलेला आरोप अत्यंत चुकीचा व खोटारडा असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.