Fri, Nov 16, 2018 03:11होमपेज › Pune › नव्या पोलिस साहेबांनो जरा सांभाळून!

नव्या पोलिस साहेबांनो जरा सांभाळून!

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 18 2018 1:10AMलोणी काळभोर : प्रतिनिधी 

सध्या पुणे ग्रामीण पोलिस दलात विविध पोलिस ठाण्यात बदलून आलेल्या नव्या पोलिस निरीक्षकांनी पदभार घेतला असून बहुतांश पोलिस निरीक्षक हे बाहेरील जिल्ह्यातून आलेले आहेत. यापैकी काही पोलिस निरीक्षकांच्या स्वागताला, दिमतीला ‘व्हाईट कॉलर लॅड माफिया’, गुन्हेगार, अवैध धंदेवाले, दलाली करणारे, यांची वर्दळ पोलिस ठाण्यात वाढली असून ‘साहेबां’चे स्वागत करतानाचे फोटो सोशल मीडियावर झळकत असल्याने जनतेचे रक्षकच अशा भक्षकांचे हारतुरे स्वीकारत असतील तर याचा संदेश सामान्य जनतेपर्यंत काय पोहचला असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत 

बदलून आलेल्या अनेक अधिकार्‍यांचा कामाच्या बाबतीत मोठा नावलौकिक आहे. बरेचसे अधिकारी धाडसी आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ‘सिंघम’ अधिकार्‍याचे ‘अमुक..अमुक कडून’ स्वागत असे फोटो झळकत आहेत. त्यामुळे या अधिकार्‍यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी वाढू लागली आहे.यातील अनेक अधिकार्‍यांना स्थानिक पार्श्वभूमी माहित नसल्याने अनेकजण आपली ‘सेटिंग’ आधीपासूनच राहावे व आपल्या काळ्या धंद्यांना संरक्षण मिळावे म्हणून  मोठे  हारतुरे, नारळ, मिठाई घेऊन पोलिस अधिकार्‍यांचे स्वागत करत आहेत.

स्वागताची चढाओढच सुरू झाली आहे. यामध्ये स्थानिक राजकीय नेत्याबरोबरच रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगार, भाई, दादा, गुंड, अवैध धंदेवाले, जुगार, मटका व्यावसायिक, फसवणूक करणारे ,तसेच पोलीस ठाण्यात मध्यस्थी करून तडजोड करणारे दलाल आणि विशेष:ता ‘लॅड माफीया’आघाडीवर आहेत.  स्वागताच्या निमित्ताने वर्दळ वाढवून साहेबाबरोबर ओळख वाढवायची व आपल्या काळ्या धंद्यांना संरक्षण मिळवायचे असे उद्योग सध्या सुरु आहेत सोशल मिडीयावर आपले फोटो साहेबाबरोबर असल्याचे ,साहेबांचे स्वागत करताना अमुक तमुक असे पोस्ट टाकण्यासाठी मोठी चढाओढ सुरु झाली आहे काही पोलीस ठाण्यातील स्थानिक पोलीस कर्मचारी या भुरट्याची साहेबासमोर चमचेगिरी करत असून किंमत नसलेला मोठेपणा साहेबासमोर चिरीमिरीसाठी दाखवत आहेत.