Sun, Feb 17, 2019 13:07होमपेज › Pune › उपेक्षीतांच्या योजनांना महापालिकेकडून कात्री

उपेक्षीतांच्या योजनांना महापालिकेकडून कात्री

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 1:20AMपुणे : प्रतिनिधी

निधी नसल्याचे कारण पुढे करून शहरातील निराधर, वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी महापालिकेने तरतूद केलेल्या पाच योजना बंद करण्याचा निर्णय महापौरांच्या कक्षात झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत घेतला आहे. 

महापालिकेच्या वतीने माता रमाई योजना, शरद स्वाभिमान योजना, बाबा आमटे योजना असा विविध योजना आखण्यात आल्या होत्या य या योजना निराधार महिला, अपंग, गतीमंद अशांना आर्थिक मदत देण्यासाठी आखल्या होत्या. अनेक गरजूंना या योजनेचा उपयोग झाला आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात सुमारे 15 कोटींची तरतूदही केली जाते. मागील वर्षी 5 कोटी रूपयांचीच तरतूद करण्यात आली होती. आता आर्थिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना निधी नसल्याचे कारण देत, योजना बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून देण्यात आला होता. 
या योजना बंदच्या विरोधात राष्ट्रवादीने भुमिका घेतली, मात्र अन्य पक्षांच्या पाठिंब्याने योजना बंदचा निर्णय घेतला. बैठकीस सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, मनसेचे वसंत मोरे, शिवसेनेचे संजय भोसले आदी बैठकीला उपस्थित होते.