होमपेज › Pune › नक्षलग्रस्त भागातील मुलांची पुणे सफर

नक्षलग्रस्त भागातील मुलांची पुणे सफर

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 12:02AMपुणे : प्रतिनिधी

शनिवारवाड्याच्या भव्य प्रवेशद्वाराकडे कुतूहलाने पाहत त्याचा इतिहास ऐकणारे विद्यार्थी... दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला मनोभावे केलेले वंदन... सिंहगडावर चढाई करण्यासाठी मुलांनी लावलेली शर्यत... सर्पोद्यान, खडकवासला धरण, आबा बागुल उद्यानातील लेझर शो अशा पुणे शहरातील विविध ठिकाणांना भेट देत नक्षलग्रस्त भागातील मुलांनी पुणे सफरीचा आनंद लुटला.

गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस विभाग व आदर्श मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील मुलांसाठी दरवर्षी महाराष्ट्र दर्शन सहलीचे आयोजन केले जाते. यावेळी नानासाहेब पेंडसे, स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, आदर्श मित्र मंडळचे उदय जगताप उपस्थित होते.