Sun, Dec 16, 2018 22:48होमपेज › Pune › जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम

जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 1:42AMपुणे ः प्रतिनिधी 

पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची महापालिका आयुक्‍त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

दरम्यान, ते आज पदभार स्विकारणार असल्याचे समजते. नवल किशोर राम हे मूळचे बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातील आहेत. त्यांचे शिक्षणही बिहार, झारखंडच्या गुरुकुल परंपरेतील असून, त्यांनी इतिहास विषयात उच्च पदवी घेतली आहे. सन 2007 मध्ये आयपीएसमध्ये निवड झाली. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बिहारमध्ये नियुक्ती मिळाली. याच दरम्यान त्यांची आयएएसमध्येही निवड झाली. प्रशिक्षणानंतर पहिली नियुक्ती त्यांना नांदेडला मिळाली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकर परदेशी यांच्याबरोबर त्यांनी त्यावेळी काम केले. दोन वर्षे यवतमाळ जिल्हा परिषदेत काम केल्यानंतर त्यांची बीडला जिल्हाधिकारीपदी नियुक्‍ती झाली. त्या पाठोपाठ त्यांची औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. 

एक वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पदाचा अनेक वषार्र्ंचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी असताना माळीण, पुरंदर येथील छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, सुप्रशासन आदी प्रश्‍न मार्गी लावण्यावर भर दिला.