Mon, Jun 17, 2019 02:15होमपेज › Pune › पंढरपूरमध्ये कोण साप सोडणार होते, ते जाहीर करा : अजित पवार

पंढरपूरमध्ये कोण साप सोडणार होते, ते जाहीर करा : अजित पवार

Published On: Jul 28 2018 12:40PM | Last Updated: Jul 28 2018 2:32PMपुणे : प्रतिनिधी

राज्याच्या महसूलमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा आणि आरोप करण्यापेक्षा त्यांच्याकडे असलेले रेकॉर्डींग जाहीर करावे. आषाढी वारी दरम्यान कोण पंढरपूरमध्ये साप सोडणार होते, हे समाजाच्या समोर यायला हवे. एकदाचे दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ दे, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

अजित पवार एका कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळी पुण्यात आले होते. ते कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकाराशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी साप सोडण्याविषयीचे रेकॉर्डींग असल्याचे वक्तव्य केले होते. या संदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात ५८ मोर्चे शांततेत काढण्यात आले. यानंतरही सरकारची संवेदना जागी झाली नाही. उलट वेगवेगळी वक्तव्ये करून जखमेवर मीठ चोळण्याचा, डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. वारीत साप सोडण्याचे वक्तव्य कोणी केले असेल, तर ते समाजापुढे आले पाहिजे. त्यातून दूध का दूध, पानी का पानी होईल.’ असेही ते म्हणाले.