Thu, Apr 25, 2019 14:18होमपेज › Pune › अहिल्यादेवींचा आदर्श सत्ताधार्‍यांनी घ्यावा

अहिल्यादेवींचा आदर्श सत्ताधार्‍यांनी घ्यावा

Published On: Jun 01 2018 2:11AM | Last Updated: Jun 01 2018 1:10AMकोथरूड/ पौडरोड : वार्ताहर

राजसत्तेचा उपयोग जनकल्याणसाठी करावा, असा आदर्श अहिल्यादेवी यांनी दिला, हाच आदर्श घेण्याची सत्ताधारकांना गरज आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

अंकुश काकडे, नगरसेवक दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शंकर केमसे, रुपाली चाकणकर, नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

चार वर्षांपूर्वी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणारे भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून हल्लाबोल कार्यक्रम 10 जून रोजी पुण्यात आयोजित  करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोथरूड येथील आशिष गार्डन येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरूड मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. नगरसेवक दीपक मानकर म्हणाले की, कुठे गेले ते अच्छे. आज साडेचार वर्ष होऊन गेली पण अच्छे दिन काही आले नाहीत. 

लोकशाहीला हुकूमशाहीचे ग्रहण लागले आहे. नगरसेवक बाबूराव चांदेरे म्हणाले की, मी स्थायी समिती अध्यक्ष असताना विविध पक्षाच्या नेत्यांना निधी दिला. दुर्दैवी बाब म्हणजे सध्या 98 भाजपचे नगरसेवक असताना त्यांचीच कामे होत नाही असा प्रकार आपल्या सत्तेमध्ये कधी पालिकेमध्ये झाला नाही. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, विकासकामाचा लेखा-जोखा आमच्याकडे आहे. 70 वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विकासकामे केली आहेत.