होमपेज › Pune › नरेंद्र दाभोलकर यांची हत्या; पाच वर्षात काय घडले? 

नरेंद्र दाभोलकर यांची हत्या; ५ वर्षात काय घडले? 

Published On: Aug 20 2018 8:45AM | Last Updated: Aug 20 2018 8:45AMअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन सोमवारी (20 ऑगस्ट 2018 रोजी) पाच वर्ष पूर्ण झाली. हत्येनंतरचा तपास आणि संशयितांच्या कृत्यांवर टाकलेला प्रकाशझोत... 

2013
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यावर दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी फायरिंग.
पुणे येथील ओंकारेश्‍वर पुलावर सकाळी 7.20 वा. जागीच मृत्यू
मारेकर्‍यांनी झाडलेल्या पाचपैकी एकूण तीन गोळ्या लागल्या.
दोघा हल्लेखोरांकडून भ्याड हल्ला झाल्याचे निष्पन्न.
डेक्कन पोलिस ठाण्यात गु.क्र. 154/ 2013 नुसार गुन्हा दाखल.
गुन्हे शाखेची तपास पथके रवाना व सीसीटीव्ही ताब्यात.
पहिल्याच दिवशी संशयिताचे रेखाचित्र जारी.
भोंदू, बोगस डॉक्टर, ज्योतिषीकडे पोलिसांची चौकशी.
27 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना तपासाबाबत सूचना
सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे चित्रीकरण तपासणीसाठी मुंबई,लंडनलाही रवाना
गोव्यातील आश्रमामध्येही छापा.
दि. 30 ऑगस्ट रोजी 8 कोटी फोन कॉल्ससह ई-मेल तपासणी सुरु.
दि. 2 सप्टेंबर रोजी बॅलेस्टीक अहवाल पोलिसांना प्राप्त.
रेखाचित्राशी साधर्म्य असणार्‍या सुमारे 17 जणांची चौकशी.
दि.19 डिसेंबर रोजी मनिष नागोरी व खंडेलवाल यांना कोठडी.

2014
दि. 16 जानेवारी रोजी गुन्हे शाखेकडून नव्याने तपास सुरु.
दि. 13 मार्च रोजी नागोरी व खंडेलवालची ओळखपरेड.
दि. 3 एप्रिल एसआयटीची स्थापना.
दि. 9 मे रोजी गुन्हे शाखेकडून तपास सीबीआयकडे.
दि. 3 जून रोजी तपासाची कागदपत्रे सीबीआयकडे.

2015
दि. 2 ऑगस्ट रोजी तपासाबाबत अंनिसचे राष्ट्रपतींना पत्र.
दि. 21 नोव्हेबर रोजी मारेकर्‍यांची पुन्हा रेखाचित्रे प्रसिध्द.

2016
दि. 31 मे - डॉ. विरेंद्र तावडे व सारंग अकोलकर यांच्या घरावर छापे.
दि. 4 जून सीबीआय तपासासाठी लंडनच्या स्कॉटलंडची मदतीची चर्चा.
दि. 10 जून 2016 रोजी तावडेला पहिली अटक.
दि. 14 जून रोजी विरेंद्र तावडे हाच मुख्यसूत्रधार असल्याचा सीबीआयचा दावा.
दि. 16 जून रोजी तावडेचा मडगाव व मिरज दंगलीतही हात. सीबीआयकडून पुणे कोर्टात दोषारोपपत्र दाखल

2017
फरारी सारंग अकोलकर व विनय पवार या दोघांची माहिती देण्यार्‍यास 5 लाखाचे बक्षिस जाहीर.
दि. 5 ऑक्टोबर रोजी तावडेचा जामीन अर्ज फेटाळला

2018
दि. 21 मे रोजी गौरी लंकेश हत्येप्रकरणी अमोल काळेस पुणेतून अटक.
दि. 30 जून रोजी काळेकडील वैभव राऊतचा उल्लेख असणारी डायरी जप्त. डायरीत महाराष्ट्रासह लेखक विचारवंतासह 36 जण हिटलिस्टवर.
दि. 6 जुलै विरेंद्र तावडेचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला.
दि. 10 ऑगस्ट रोजी वैभव राऊतकडून नालासोपारात बॉम्बसह स्फोटके जप्त. याच दिवशी सातार्‍याच्या सुधन्वा गोंधळेकर, शरद कळस्करलाही अटक.
दि. 11 ऑगस्ट रोजी राऊतसह दोघांवर विचारवंताच्या हत्येचा संशय.
दि. 12 ऑगस्ट रोजी सुधन्वाकडून बंदूक, पिस्तूल जप्त.
12 ऑगस्ट रोजी सातारा ‘पुढारी’कडे डॉ. हमीद दाभोलकर यांच्याकडून नालासोपारा कनेक्शन दाभोलकर हत्येसंदर्भात तपासण्याची मागणी.
दि. 13 ऑगस्ट ‘पुढारी’च्या वृत्ताने राज्यभर खळबळ.
दि. 14 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चावर होता सुधन्वाचा वॉच असल्याचे वृत्त ‘पुढारी’ने एक्सपोझ केले.
दि. 14 रोजी पुणे एटीएसचा सुधन्वाच्या सातार्‍यातील घरावर छापा. सुधन्वाच्या घरातील व कार्यालयातील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे व नोंदी आढळल्या.
दि. 14 रोजी एटीएसने सचिन अंदुरेला डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणीअटक.
दि. 16 रोजी अंदुरेला पुन्हा चौकशी करून सोडले.
दि.16च्या रात्री सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली.
दि.18 रोजी सचिन अंदुरेला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे सीबीआय व एटीएसने संयुक्तपणे जाहीर केले.