Sun, Sep 23, 2018 04:22होमपेज › Pune › बिबट्याच्या 3 पिल्लांचा होरपळून मृत्यू

बिबट्याच्या 3 पिल्लांचा होरपळून मृत्यू

Published On: Feb 04 2018 2:14AM | Last Updated: Feb 04 2018 2:01AMनारायणगाव : प्रतिनिधी  

जुन्नर तालुक्यातील ओझर येथे उसाला लागलेल्या आगीत बिबट्याच्या तीन पिलांचा होरपळून मृत्यू झाला. उसात वीजवाहक तारा पडून आगीची ही घटना शनिवारी पहाटे घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. ओझर येथील जगदाळे मळ्यातील राजेंद्र जगदाळे यांच्या उसात वीजवाहक तारा पडून शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ही आग लागली. या उसात असलेल्या बिबट्याच्या एका महिन्याच्या तीन पिलांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती सुनील कवडे 

यांनी वनविभागाला कळवली असता वनपाल मनीषा काळे, वनरक्षक कांचन ढोमसे यांनी घटनास्थळी भेट दिली.  वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी बिबट्याची मृत दोन पिले ताब्यात घेतली; मात्र एका मृत पिलाभोवती बिबट्याची मादी घिरट्या घालत आहे. ती या घटनेमुळे आक्रमक झाली असल्याने पिलू ताब्यात घेता आले नाही. ताब्यातील पिलांचे पशुवैद्यकीय अधिकारी संजय कुमकर यांनी शवविच्छेदन केले. हिवरे येथील गिब्सन पार्कमध्ये येथे बछड्यांचे दहन करण्यात आले.