Mon, Aug 26, 2019 01:42होमपेज › Pune › मूकबधिर नंदकिशोरने नागांना दिले जीवदान

मूकबधिर नंदकिशोरने नागांना दिले जीवदान

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:31AMवडगाव मावळ : प्रतिनिधी 

गेल्या अनेक वर्षांपासून वडगाव शहर व परिसरात सर्पमित्र म्हणून जनसेवा करणार्‍या येथील मुकबधीर सर्पमित्राने ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी एकाच ठिकाणी चक्क दोन नाग पकडल्याने त्यांना जीवदान मिळो तर नागरिकांनाही शिवरात्रीच्या दिवशी नागाचे दर्शन घडले.

नंदकिशोर कासार नावाचा हा सर्पमित्र बालपणापासून मुकबधीर असून कोणत्याही हत्याराशिवाय हाताने नाग असो किंवा साप असो तो पकडण्यात नंदकिशोर हा अत्यंत तरबेज आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी अशाच प्रकारे येथील श्री खंडोबा मंदिराच्या आवारात साप असल्याचे निदर्शनास आल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती. नेहमीप्रमाणे सर्वांनाच मुक्याची आठवण झाली, माजी उपसरपंच विशाल वहिले यांनी तात्काळ ‘मुक्या‘ ला आणले.

दरम्यान,  क्षणार्धात हजर झालेल्या मुक्याने मंदिर परिसराच्या आवारात फिरत असलेल्या या दोन्ही नागांना मोठ्या शिताफीने पकडून त्यांना जीवदान दिले. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी नागांचे दर्शन घडल्याने घाबरलेले नागरिकही सुखावले.