Tue, Apr 23, 2019 02:03होमपेज › Pune › ‘खिळेमुक्‍त झाडे’ अभियानास प्रतिसाद

‘खिळेमुक्‍त झाडे’ अभियानास प्रतिसाद

Published On: Apr 14 2018 10:30AM | Last Updated: Apr 13 2018 11:47PMपिंपरी : प्रतिनिधी

‘अंघोळीची गोळी’ या सामाजिक संस्थेने सुरु केलेल्या  खिळेमुक्त झाडे  नेल फ्री ट्री - पेन फ्री ट्री मोहिमेला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

चार आठवड्यांपासून राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांचा सहभाग वाढत आहे. नुकतीच भेळ चौक ते बिग इंडिया परीसरात ही मोहिम राबवण्यात आली. यात रत्यावरील जवळपास 70 झाडांना खिळेमुक्त करण्यात आले. यात 100 नागरिकांनी सहभाग नोंदवला. 

पिंपरी-चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाचाही या मोहिमेत सहभाग लक्षणीय असून शहरातील सर्वच झाडे खिळेमुक्त करण्याचा संकल्प सदस्यांनी बोलून दाखवला. शहरातील पर्यावरण प्रेमी संघटना व सामाजिक संस्था यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत. प्राधिकरणाला भारतातील पहिले खिळेमुक्त-स्वच्छ झाडे असलेले क्षेत्र बनवू व पंतप्रधानांना प्राधिकरण पाहण्यासाठी आमंत्रण देऊ, असा विश्‍वास पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सूर्यकांत मुथियान यांनी बोलून दाखवला.