Fri, Feb 22, 2019 15:43होमपेज › Pune › बिबट्याने पाडला  शेळ्यांचा फडशा

बिबट्याने पाडला  शेळ्यांचा फडशा

Published On: Dec 13 2017 2:38AM | Last Updated: Dec 13 2017 2:00AM

बुकमार्क करा


न्हावरे ः प्रतिनिधी

न्हावरे (ता. शिरूर) परिसरातील कुटेवस्ती येथे बिबट्यानेे गोठ्यातील जनावरांवर हल्ला करून चार शेळ्यांच्या करडांचा फडशा पाडला. या घटनेने न्हावरे परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.येथील शेतकरी उत्तमराव सोनवणे यांच्या शेळ्यांच्या करडावर बिबट्याने सोमवारी (दि. 11) मध्यरात्री हल्ला केला. त्यामध्ये दोन करडे जागेवरच मृत्युमुखी पडली तर दोन करडे शेजारील उसाच्या शेतात मरून पडल्याचे आढळून आले. बिबट्याच्या या दहशतीने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मध्यरात्री बिबट्याच्या हल्ल्याच्या आवाजाने आनंदा सोनवणे हे जागे झाले होते, तोपर्यंत बिबट्याने शिकार केली होती. सकाळी वनखात्याच्या अधिकार्‍यांनी संबंधित घटनेचा पंचनामा केला.  दोन महिन्यांपूर्वी अशाच पध्दतीने बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली जात होती.