Sat, Feb 16, 2019 16:50



होमपेज › Pune › विदर्भामध्ये थंडीची लाट

विदर्भामध्ये थंडीची लाट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

विदर्भात गेल्या 2-3 दिवसांपासून हुडहुडी भरवणारी थंडी असून, रविवारी तर थंडीची लाट आल्याचे चित्र दिसले. नागपूर येथे 10.4 अंश सेल्सियस एवढे राज्यातील नीचांकी तापमान होते.

राज्यात यवतमाळ 11.4, वर्धा 11, गोंदिया 10.6, पुणे 14.2, महाबळेश्‍वर 15.6, सातारा 16, औरंगाबाद 13.4 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील 3-4 दिवसांत विदर्भ, मराठवाड्यात थंडीत आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून, तेथून राज्याच्या दिशेने अतिथंड व कोरडे वारे वाहत आहेत. त्याच्या जोडीलाच राज्यातील ढगाळ वातावरण आता निवळले असून, आकाश आता निरभ्र बनले आहे.