Sun, Jun 16, 2019 12:26
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › मोशीत मानाचा विडा २८ लाखाला

मोशीत मानाचा विडा २८ लाखाला

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:53AMमोशी : प्रतिनिधी

नागेश्वर महाराजांच्या उत्सवास शिवरात्रीपासून सुरुवात झाली असून गुरुवारी परंपरागत लिलाव नागेश्वर महाराज मंदिर सभागृहात पार पडला. उत्सवात वापरल्या गेलेल्या वस्तुंचा लिलाव तब्बल लाखोंच्या घरात गेला आहे.नागेश्वर महाराजांबाबत मोशीकरांची मोठी श्रद्धा असून वस्तुंच्या लाखोच्या बोलीतून श्रद्धा व्यक्त होताना दिसून येतो. मोशीतील नागेश्वर महाराज सभामंडपामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून लिलावाला सुरवात झाली .

सुरवातीचे पहिले मानाचे लिंबू रोहिदास हवालदार यांनी 4 लाख 15 हजार रुपयांना घेतले . सर्वांचे लक्ष्य लागून असलेल्या मान असलेल्या मानाच्या लिबू,ओटी व मानाच्या वीड्यासाठी लिलाव सुरु झाल्यानंतर मानाच्या ओटीची  लिलावात अतील आल्हाट  यांनी 18  लाख रुपये बोली लावून खरेदी केली.सर्वात शेवटी सर्वांचे लक्ष्य लागून असलेल्या शेवटचा मानाचा विड्याचा लिलाव सुरु झाल्यानंतर अनेकांनी श्वास रोखून धरला होता . शेवटचा मानाचा विडा नितीन सस्ते,विजय सस्ते यांनी 28 लाख रुपये बोली लावून खेरदी केले.परंपरेनुसार नारायण केदारी ,सागर केदारी,निखील केदारी यांनी बोली लावण्याचे काम पाहिले.

महाशिवरात्री नंतर मोशी यात्रेस सुरुवात होते.सर्वप्रथम भंडारा उत्सव,उरूस, लिलाव,आखाडा असे स्वरूप असते .मंगळवार पासून भाविकांनी मंदिर परिसर व आमराईतील नंदादीप परिसरात गर्दी केली होती.शहर परिसर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी भंडारा उत्सवात  सहभागी होत  महाप्रसादाचा लाभ घेतात. भंडार्‍याच्या दिवशी ग्रामस्थांकडून बुंदी व शेकभाजी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. बुधवारी आमराईमध्ये होम,हवन,महापूजा,आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविक भक्तांची वर्दळ सुरु होती.सायंकाळ नंतर भाविकांच्या पंगती बसून महाप्रसादाचे वाटप झाले.गुरुवारी सुरु झालेल्या लिलावासाठी ग्रामस्थांनी सकाळपासुनच मंदिरात हजेरी लावली होती.उत्सवातील वस्तूंचा लिलाव हा पंचक्रोशीतील भाविकांच्या दृष्टीने एक विशेष पर्वणीचा सण असतो.त्यामुळे लिलाव पाहण्यासाठी मंडपामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी 
केली होती.