Fri, Jul 19, 2019 05:33होमपेज › Pune › ‘एनजीटी’चे काम 75 दिवसांपासून ठप्पच

‘एनजीटी’चे काम 75 दिवसांपासून ठप्पच

Published On: Apr 16 2018 1:43AM | Last Updated: Apr 16 2018 1:13AMपुणे : महेंद्र कांबळे 

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणातील (एनजीटी) न्यायाधिशांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी परिस्थिती असली तरी, मागील 75 दिवसांपासून एनजीटीचे कामकाज न्यायाधीश निवडीची प्रक्रिया लांबत चालल्यामुळे ठप्पच असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे न्यायासाठी धाव घेतलेल्या तक्रारदारांना न्यायासाठी केवळ वाटच पाहावी लागत आहे.  

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला एकसदस्यीय खंडपीठाद्वारे कामकाज सुरू ठेवण्यास बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कायदेशीर पेच निर्माण होऊन पुणे, चेन्नई, भोपाळ, कोलकाता येथील एनजीटीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. केवळ दिल्‍ली येथील खंडपीठाचे कामकाज सुरू होते. एनजीटीच्या मुख्य न्यायाधिशांच्या निवृत्तीनंतर न्यायाधीश, सदस्य निवडीच्या समितीतील एनजीटीच्या मुख्य न्यायमूर्तीची निवृत्ती झाल्याने समितीचे काम थांबले होते. एनजीटीचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून सर्वोच्च न्यायालयाने न्या. जवाद रहिम यांची नियुक्‍ती केल्यानंतर समितीतील जागा भरली गेली. त्यामुळे एनजीटीतील न्यायमूर्तींच्या सदस्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला खरा परंतु, अद्यापही एनजीटीच्या पुणे खंडपीठाचे कामकाज ठप्पच आहे.  

देशातील पश्‍चिम भागाचे म्हणजे महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांतील पर्यावरणीय दाव्यांसाठी पुण्यात 15 ऑगस्ट 2013 रोजी खंडपीठ स्थापन झाले.  सध्या पुणे न्यायाधिकरणात 547 अधिक याचिका प्रलंबित आहेत. तर सर्व एकूण सर्व एनजीटीच्या खंडपीठांचा विचार करता 2 हजार 945 याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे लवकरात लवकर पुणे येथील खंडपीठ सुरू व्हावे, अशी मागणी आता विविध स्तरातून होत आहे.  

Tags : NGT's work, jammed, 75 day, pune news,