Thu, Jan 17, 2019 14:16होमपेज › Pune › राष्ट्रपतींच्या उपस्थितीत एनडीएचा दीक्षांत समारंभ उत्साहात 

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत एनडीएचा दीक्षांत समारंभ उत्साहात 

Published On: May 30 2018 12:53PM | Last Updated: May 30 2018 12:53PMपुणेः प्रतिनिधी

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) 134 वा दीक्षांत समारंभ आज बुधवारी (दि. 30) मोठ्या उत्साहात पार पडला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

देशाच्या लष्करी सेवेत विविध ठिकाणी सेवा बजावण्यासाठी तीन वर्षांच्या खडतर प्रवासानंतर या प्रबोधिनीमधील विद्यार्थी सज्ज होतात. तीन वर्षांमध्ये त्यांना स्थलसेना, वायुसेना आणि नौसेना या तीनही दलांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर ही परेड घेण्यात आली. यावेळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. राष्ट्रीय संरक्षण अकादमीची 134 वी तुकडी या परेडनंतर देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे.