Thu, Aug 22, 2019 08:18होमपेज › Pune › धनंजय मुंढे यांच्यावरील आरोपांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फ आंदोलन

धनंजय मुंढे यांच्यावरील आरोपांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फ आंदोलन

Published On: Mar 06 2018 7:23PM | Last Updated: Mar 06 2018 7:23PMपिंपरी : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्यावर झालेल्‍या आरोपाच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 

सभागृहात प्रश्न न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून गुरुवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर भाजप सदस्यांनी दोन्ही सभागृहात टीका केली. मुंढे यांचे निलंबन करावे, या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. दरम्यान भाजपने केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे ओदोलन करण्यात आले.  

या आंदोलनात नगरसेवक नाना काटे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, विशाल काळभोर, लाला चिंचवडे, विजय लोखान्दे, आनंदा यादव, गँगा धेंडे, रुपाली गायकवाड, संतोष वाघेरे, मयूर वाकडकर, सचिन मोरे, मंगेश बजबळकर, प्रतीक साळुंके आदी सहभागी झाले होते. 

राष्ट्रवादीने केलेल्या हल्लाबोल आंदोलनामुळे भाजप अस्वस्थ झाले आहे.  त्यातूनच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खोटे आरोप केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.