Wed, Apr 24, 2019 08:03होमपेज › Pune › पिंपरी मतदारसंघाकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष

पिंपरी मतदारसंघाकडे राष्ट्रवादीचे दुर्लक्ष

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 12:53AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

फाजिल आत्मविश्वासामुळे मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पिंपरी मतदार संघात अवघ्या 2 हजार 335 मतांनी पराभव पत्करावा लागला मात्र यातून पक्षाचे नेते शहाणपण शिकले नसल्याचे दिसत आहे हल्लाबोल आंदोलनंतर्गत भोसरी व चिंचवडला सभेचे नियोजन करणार्‍या राष्ट्रवादीने या मतदार संघाकडे  जणू पाठ फिरवली आहे राष्ट्रवादीचे पिंपरी मतदार संघाकडे दुर्लक्ष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अभय ठरणार आहे

सन 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती होती.शिवसेनेने पिंपरी मतदार संघावर दावा सांगितला मात्र भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी अमर साबळे यांच्यासाठी हा मतदारसंघ मागून घेतला .त्याआधी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत झालेल्या पाडापाडीच्या राजकारणास प्रत्युत्तर म्हणून ज्येष्ठ नेते आझम पानसरे समर्थकांनी कमळ फुलविण्याचा प्रयत्न केला मात्र या मतदार संघातून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी भाजपचे अमर साबळे यांचा 9 हजार 438 मतांनी पराभव करून विजयश्री खेचून आणली . बनसोडे यांना 60 हजार 970, तर साबळे यांना 51 हजार 502 मते मिळाली या मतदारसंघात रिपब्लिकन डावी लोकशाही समिती (’रिडालोस’) मध्ये मतदार संघ कोणाला सोडावा बाबत एकमत न झाल्याने मानव कांबळे जनता दल (धर्मनिरपेक्ष)तर्फे ,तर चंद्रकांता सोनकांबळे आरपी आय तर्फे रिंगणात उतरल्या  सोनकांबळे यांना 11 हजार 135 तर मानव कांबळे यांना 8 हजार 240 मते मिळाली.

सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महा युती तुटल्यानंतर भाजपने तत्कालीन नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांच्या रूपाने पिंपरी मतदारसंघ आरपीआय ला सोडला त्यामुळे 2009 च्या निवडणुकीत पराभूत झालेले व पुन्हा इच्छुक असलेले अमर साबळे यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी पसरली तरीही संघ परिवाराने शिलाई मशीन चिन्ह मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला मात्र कमळाचे चिन्ह नसल्याचा फटका सोनकांबळे यांना बसला  शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांची लॉटरी लागली .आघाडी सरकार विरोधात असंतोष असला तरी चाबुकस्वार व सोनकांबळे यांच्यात होणारी मतविभागणी  आपल्या पथ्यावर पडेल असा फाजील आत्मविश्वास बाळगून राहिल्याने राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांना 2 हजार 335 मतांनी पराभूत व्हावे लागले राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मतदारसंघाकडे केलेले दुर्लक्षही बनसोडे यांच्या पराभवाचे कारण ठरले. चाबुकस्वार यांना 51096, बनसोडे यांना 48761 तर सोनकांबळे यांना 47288 मते मिळाली.

यावेळी या मतदार संघात भाजपतर्फे सीमा सावळे, वेणु साबळे, राजेश पिल्ले, अमित गोरखे अशी इच्छुकांची मांदियाळी आहे मात्र मागील वेळी आम्ही अडीच हजारांनी पराभूत झालो असलो तरी यावेळी आरपीआय ही जागा 25 हजारापेक्षा अधिक मतांनी जिंकेल असे सांगत पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी  योग्य ते संकेत दिले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना, राष्ट्रवादी व आरपीआय लढतीची शक्यता आहे शिवसेनेतर्फे आमदार गौतम चाबुकस्वार व नुकतेच व्हाया भाजप सेनेत प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे इच्छुक आहेत. 

मात्र विद्यमान आमदार म्हणून गौतम चाबुकस्वार यांनाच सेनेतर्फे पुन्हा संधी दिली जाईल असे सेनेच्या वर्तुळात बोलले जात आहे राष्ट्रवादीच्या गोटात मात्र पिंपरीत शांतता आहे नेत्यांची मागच्या अनुभवातून काही शिकण्याची  मानसिकता दिसत नाही अगदी हल्लाबोल आंदोलनांतर्गत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे नियोजन करताना त्यातून पिंपरीला वगळले आहे केवळ भोसरी मतदार संघातील गावजत्रा मैदान व चिंचवड मतदार संघातील काळेवाडी येथेच येत्या दि. 10 व 11  रोजी सायंकाळी 6 वाजता पक्षाच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले आ लक्ष्मण जगताप व भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीचे पिंपरीकडे दुर्लक्ष झाले आहे या राजकारणामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अभय मिळण्याची शक्यता आहे.

 

Tags : pune, pune news, NCP, Pimpri constituency, neglect,