Sun, Feb 17, 2019 10:07होमपेज › Pune › हल्लाबोल यात्रेचा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी समारोप

हल्लाबोल यात्रेचा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी समारोप

Published On: Apr 29 2018 3:59PM | Last Updated: Apr 29 2018 3:59PMपुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभर सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेचा येत्या 10 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर पुण्यात समारोप होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात जाहीर सभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ही माहिती दिली.

हल्लाबोल यात्रेला संपूर्ण राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हवा बदलत आहे, त्याचा फायदा पक्षाला करून घ्यायचा आहे असे पवार यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, या हल्लाबोल यात्रेचा समारोप पुण्यात 10 जूनला करण्यात येईल, राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीनंतर पक्षाचे अधिवेशन 10 जूनला पुण्यात होईल, याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागात जाहीर सभेने हल्लाबोलचा समोरोप होईल, त्यासाठी पुणे शहर, जिल्हा, पिंपरी चिंचवड आणि त्याचबरोबर सातारा, कोल्हापूर या भागातून कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.