Tue, Aug 20, 2019 04:09होमपेज › Pune › NCP ने पिंपरीत उभारली महिला असुरक्षिततेकडे लक्ष वेधणारी गुढी

NCP ने पिंपरीत उभारली महिला असुरक्षिततेकडे लक्ष वेधणारी गुढी

Published On: Mar 18 2018 4:31PM | Last Updated: Mar 18 2018 5:43PMपिंपरी- चिंचवड : पुढारी ऑनलाईन 

महिलांच्या असुरक्षितेकडे लक्ष वेधण्यासाठी आज (रविवारी १८ मार्च)  खराळवाडी येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या आवारात आगळी वेगळी गुढी उभारण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून महिला सुरक्षिततेसह पिंपरी-चिंचवडमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहरप्रदेशाध्यक्ष वाघेरे यांनी महिला सुरुक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस सरकारवर टिकास्त्र सोडले.  केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असून महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिले जात नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात दिवसा-ढवळया खून, बलात्कार यासारख्या गंभीर घटना घडतात. परंतु मुख्यमंत्री याची गंभीर दखल घेत नाहीत. पिंपरी-चिंचवडमध्येही गुन्हेगारी वाढत आहे. महिलांवर होणारे अत्याचार, खून, चैन खेचून नेणे, छेडछाड, विद्यार्थावर हल्ले वाढले आहेत. पण सरकारचे याकडे लक्ष नाही. ही अत्यंत दुर्देवी बाब आहे, असे वाघेले म्हणाले. 

यावेळी वर्षा जगताप  म्हणाल्या की, राज्यातील सर्वसामान्य महिला,युवती  तणावाखाली जीवन जगत आहेत. कॉलेज आणि कामाच्या ठिकाणी अनेक वेळा महिलावर अत्याचार  केले जात आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर  वचक राहिलेला नाही. त्यामुळे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.  मागील दोन दिवसांत शहरातदोन गंभीर घटना घडून देखील राज्य सरकारच्यावतीने पालकमंत्री किंवा जबाबदार पदाधिकारी यांनी कोणतेही दखल घेतलेली नाही, ही निंदणीय बाब आहे. सत्तेत येण्यापूर्वी‘न भय,ना भ्रष्टाचार’अशा वल्गना करू सत्ता मिळविलेल्या भाजपने जनतेला वेड्यात काढले आहे. त्यांना जनतेच्या हिताचे  देण-घेणे नसून केवळ सत्तेत रस आहे.
 

Tags : NCP Youth Congress,  Gudhi Padawa,  Women Safety, Women Problems, Pimpari, Chinchwad, Pune