Mon, Jun 17, 2019 04:12होमपेज › Pune › कोणत्या निकषावर शाळा बंद करता? सुप्रिया सुळेंचा शिक्षण मंत्र्यांना सवाल

कोणत्या निकषावर शाळा बंद करता? सुप्रिया सुळेंचा शिक्षण मंत्र्यांना सवाल

Published On: May 28 2018 6:09PM | Last Updated: May 28 2018 6:09PMपुणे : पुढारी ऑनलाईन

राज्याचे शिक्षणमंत्री शब्दांचा खेळ करत स्वत:चे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर निशाणा साधला आहे. राज्याचे सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात शाळा बंदच्या मुद्यावरुन  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता. यापार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील शाळा बंद करण्याचा सरकारला धारेवर धरले आहे. सरकार कोणत्या निकषावर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिक्षण विभागाचे प्रधान सचिव म्हणाले होते की,  80 हजार शाळा बंद करून 3 हजार शाळा राहतील. एकही मराठी शाळा बंद होणार नाही, असे स्पष्टिकरण देण्यात आले होते, पण शिरूर(शिंदोदी) येथील शाळेत 13 पटसंख्या असल्याने बंद करण्यात येत आहे. येथून दुसरी शाळा 3 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही शिक्षणात राजकारण आणत नाही, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत मांडली. शिक्षणाच्या दर्जा संदर्भात मतभेद नसतात, असेही त्या म्हणाल्या.  महाराष्ट्र शिक्षणात सोळा नंबरवरून  तिसऱ्या क्रमांकाला गेल्याचे सरकार सांगत आहे. पण हे कुठल्या बेसवर सांगतायत कळायला मार्ग नाही. एखाद्या आदिवासी पाड्यावर 3 मूल असतील तर तुम्ही शाळा बंद करणार मग या विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्काचं काय? शाळा बंद करताना नक्की कोणता निकष लावला जातोय? असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले. शाळा लांब असल्याने अनेकांना पायपीट करावी लागणार आहे, त्यामुळे   शिक्षणमंत्र्यांनी अशा मुलांना बससेवा द्यावी, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.