Sat, Apr 20, 2019 07:56होमपेज › Pune › दुधाला योग्य दर देण्यास सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे 

दुधाला दर देण्यास सरकार गंभीर नाही : सुप्रिया सुळे 

Published On: Jul 16 2018 4:19PM | Last Updated: Jul 16 2018 4:19PMपुणे : पुढारी ऑनलाईन

दुधाला योग्य दर देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांनी राज्यात सुरू असलेल्या दूध दर आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुधाकडे विद्यमान राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यासाठी पुण्यात आंदोलन करत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शेतकरी पोटतिडकीने मागण्या मांडत असताना या सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. आता दुधासाठी तो हक्काचा दर तो मागतोय. आता सरकारने जागे व्हायलाच हवे, असे त्यांनी नमूद केले आहे.

 

शेतीला उत्तम जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूधाकडे विद्यमान राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.दुधाला योग्य दर देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही.यामुळेच @NCPspeaksने पुण्यात आंदोलन केले.या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला pic.twitter.com/1FFob2yZma

— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2018