Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Pune › अ‍ॅड. वंदना चव्हाणांना पुन्हा राज्यसभेवर संधी

अ‍ॅड. वंदना चव्हाणांना पुन्हा राज्यसभेवर संधी

Published On: Feb 28 2018 1:41AM | Last Updated: Feb 28 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी

राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपुष्टात येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांना पक्षाने पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

राज्यसभेच्या 58 खासदारांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असून, राष्ट्रवादीच्या अ‍ॅड. वंदना चव्हाण, डी. पी. त्रिपाठी, काँग्रेसचे रजनी पाटील, राजीव शुक्‍ला,  भाजपचे अजित संचेती आणि शिवसेनेचे अनिल देसाई यांचा समावेश आहे. या रिक्त होणार्‍या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या दोन जागा रिक्त होणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीला एकच जागा मिळू शकणार आहे. त्यासंदर्भात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यात एका जागेसाठी अ‍ॅड. चव्हाण यांना पुन्हा संधी देण्यावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

पर्यावरणप्रेमी असलेल्या अ‍ॅड. चव्हाण यांनी राज्यसभेत त्यांच्या कामाचा ठसा उमटला आहे. अनेक महत्त्वाच्या चर्चेत अभ्यासपूर्ण मते मांडत त्यांनी पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कामाची पावती म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली असल्याचे सांगण्यात आले.