Sat, Sep 22, 2018 13:29होमपेज › Pune › प्रेयेसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीसह आठ महिन्याच्या मुलाला संपवले

प्रेयेसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीसह आठ महिन्याच्या मुलाला संपवले

Published On: Jun 10 2018 8:52AM | Last Updated: Jun 10 2018 2:41PMवाकड : वार्ताहर 

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी स्वत:ची पत्नी आणि चिमुकल्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून लूटमारीचा बनाव करणाऱ्या नराधमाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची प्रेयसी व दोन मारेकऱ्यांना देखील ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

दत्ता वसंत भोंडवे (३०,रा.दारूब्रे, मावळ) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हिंजवडीच्या हद्दीतील नेरे गाव परिसरात महिलेसह बाळाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दत्ता भोंडवेनेच पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

डांगे चौक येथून परत येत असताना पत्नी अश्विनी आणि आठ महिन्याचा अनुजचा  दोन अज्ञात हल्लेखोरांनी लूटमार करत खून केल्याचा बनाव फिर्यादी दत्ताने केला होता. परंतु त्याच्या सांगण्यात आणि प्रत्यक्ष घटनेत मोठी तफावत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानेच सुपारी देऊन हा खून केला असल्याची कबुली दिली.