होमपेज › Pune › काम दाखवा; नाहीतर घरचा रस्ता

काम दाखवा; नाहीतर घरचा रस्ता

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 1:04AMपुणे : पांडुरंग सांडभोर

कामचुकारपणा करणार्‍या, अकार्यक्षम कर्मचार्‍यांना महापालिका आता थेट घरीच बसवण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या सेवेत असलेल्या आणि ज्यांच्या वयाची 50 वर्षे पूर्ण झाली आहेत, अथवा ज्यांची 30 वर्षांपेक्षा अधिक सेवा झाली आहे, अशा कर्मचार्‍यांची कार्यक्षमता तपासण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अकार्यक्षम कर्मचार्‍यांना सक्तीने सेवानिवृत्त केले जाईल. कर्मचार्‍यांची पहिल्यांदाच अशी तपासणी होणार आहे.

पुणे महापालिकेत जवळपास 17 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. महापालिकेच्या सेवा विनियमामध्ये सेवकांचे काम समाधानकारक नसल्यास तसेच सरासरी प्रमाणपेक्षा कमी प्रतीचे काम असल्यास अशा सेवकांना मुदतपूर्व निवृत्त होण्यास भाग पडण्याची तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (निवृतवेतन) नियमानुसार कर्मचार्‍यांची पात्रापात्रता तपासून अकार्यक्षम आणि सचोटीस अपात्र ठरणार्‍यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यासंबधीचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत.