Thu, Jul 18, 2019 00:03होमपेज › Pune › पालिकेच्या सात जलतरण तलावांची सुरक्षा वार्‍यावर

पालिकेच्या सात जलतरण तलावांची सुरक्षा वार्‍यावर

Published On: Apr 25 2018 2:00AM | Last Updated: Apr 25 2018 1:48AMपुणे : प्रतिनिधी, 

महापालिकेच्या 31 जलतरण तलावांपैकी 10 जलतरण तलाव बंद असून उर्वरित 21 जलतरण तलावांपैकी 7 जलतरण तलाव असुरक्षित असल्याची माहिती सुरक्षा लेखापरीक्षण अहवालातून (सेफ्टी ऑडिट रिपोर्ट) उघडकीस आली आहे. तळजाई टेकडीवरील महापालिकेच्या क्रीडा संकुलातील जलतरण तलावात पंधरा दिवसापूर्वी प्रफुल्ल वानखेडे या 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. या पार्श्‍वभूमीवर पालिकेचे जलतरण तलाव ज्या ठेकेदारांना चालवण्यास दिले आहेत, ते नियमाप्रमाणे चालविले जातात का ? जलतरण तलावाच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा पुरवण्यात येते का ? याबाबतचे सेफ्टी ऑडिट करून त्याचा रिपोर्ट आठ दिवसांत देण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले होते. प्रथम हा रिपोर्ट सादर करण्यास टाळाटाळ होत होती. अखेर जलतरण तलावाच्या सुरक्षेबाबतचा पंन्नास पानांचा अहवाल मंगळवारी स्थायीमध्ये सादर केला.

जलतरण तलाव सुरक्षा समितीमध्ये पाच अधिकार्‍यासह राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटीच्या  प्रतिनिधीचा समावेश होता.  या समितीने केलेल्या तपासणीत या तलावांमध्ये प्रशिक्षण घेतलेले लाईफ गार्ड, संबधित ठेकेदाराकडे जलतरण चालविण्याचा परवाना आहे किंवा नाही. फिल्टरेशन प्लॅन्ट, पाण्यतील क्लोरिन तपासणी, जीव रक्षक साधणे, दोर्‍या, ट्युब, बांबू टायर, पकडण्यासाठी रेलिंग आहेत किंवा नाहीत, जलतरण तलावाच्या क्षमतेनुसार, प्रवेश दिले जात आहेत किंवा नाहीत, याची तपासणी केली. या समितीने पालिकेच्या 31 जलतरण तलावाची पाहणी केली. त्यापैकी केवळ 4 जलतरण तलाव सुरक्षित आहेत. तसेच 9 जलतरण तलाव हे सरासरी सुरक्षित असून 7 जलतरण तलाव असुरक्षित आहे. दहा जलतरण तलाव हे पुर्णपणे बंद स्थितीत आहेत. 

Tags : Pune, Municipal corporations,  seven, swimming pools, unsafe