होमपेज › Pune › शहरातील खेळांडुना महापालिकेचे विमा संरक्षण

शहरातील खेळांडुना महापालिकेचे विमा संरक्षण

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी

जिल्हापातळीपासून थेट राष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये शहराचा नावलौकिक वाढविणर्‍या शहरातील सर्व प्रकारच्या खेळाडूंना महापालिका आता आरोग्य विम्याचे संरक्षण देणार आहे. यासंबधीचा प्रस्ताव अंतिम टप्यात असून पुढील महिन्यात तो स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. खेळाडूंचा विमा ्उतरविणारी पुणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे.

महापालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या महत्वकांक्षी योजनेची तरतुद केली आहे. त्यानुसार क्रिडा विभागाकडून या योजनेचे काम सुरू आहे. शहरातील जे खेळाडु जिल्हा व त्यापेक्षा वरील स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यात कामगिरी अशा खेळांडुचा विमा मोफत उतरविला जाणार आहे. त्यानुसार  एखाद्या खेळाडूला कायमचे अपंगत्व आल्यास अथवा काही कारणाने खेळाडुचा मृत्यु झाल्यास त्या खेळाडूला अथवा त्याच्या कुंटुंबियांना मदत व्हावी, यासाठी ही योजना आणली जात आहे. त्याची आर्थिक जबाबदारी महापालिका उचलणार आहे.  

या विमा योजनेसाठी  शहरातील खेळाडूंची माहिती संकलित  करण्याचे काम पालिका प्रशासनाने सुरू केले आहे. हे काम अंतिम टप्यात असून पुढील महिन्यात हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समिती समोर येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

ह्या अटी असणार

प्रामुख्याने जिल्ह्या स्तरावर विविध स्पर्धांमध्ये खेळणार्‍या 5 ते 30 वर्षे वयोगटातील खेळाडूंना या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. संबधित खेळाडू हा शहरातील रहिवाशी असावा ही महत्वाची अट त्यात असणार आहे.