Mon, Jun 17, 2019 04:19होमपेज › Pune › पिंपरी : प्राधिकरणातील तीन अनधिकृत मंदिरांवर कारवाई

पिंपरी : प्राधिकरणातील तीन अनधिकृत मंदिरांवर कारवाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने आज प्राधिकरणातील तीन अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्यात आली. यातील म्हाळसकांत विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मंदिर पाडताना कारवाईस नागरिकांचा विरोध झाला. पदपथावरील अतिक्रमणांकडे पालिका लक्ष देत नाही मंदिरांवरच कारवाई का? असा प्रश्न नागरिकांनी केला. मात्र पोलीस बंदोबस्तात कारवाई पार पाडण्यात आली.

या कारवाईत प्राधिकारणातील महापालिका कोर्टासमोरच्या रस्त्यावरील एक, तसेच रस्टन कॉलोनी, म्हाळसकांत विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्रत्येकी एक गणेश मंदिर पाडण्यात आले. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या नेतृत्वाखाली तीन उपअभियंता ,सहा कनिष्ठ अभियंता , बिट निरीक्षक उपस्थित होते. यावेळी  २ जेसीबी, प्रत्येकी एक कटर, टेम्पो, ट्रक, महापालिकेचे पोलीस आणि निगडी पोलीस यांच्या मदतीने हि कारवाई करण्यात आली.