Sat, Nov 17, 2018 10:01होमपेज › Pune › पालिकेचे सहायक आयुक्तपद २७  वर्षांपासून रिक्त

पालिकेचे सहायक आयुक्तपद २७  वर्षांपासून रिक्त

Published On: Jan 25 2018 1:18AM | Last Updated: Jan 25 2018 12:44AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अस्थापनेवरील नागरवस्ती विभागातील सहायक आयुक्त सामूहिक विकास हे पद गेल्या 27 वर्षापासून रिक्त आहे. आतापर्यंत त्या जागेवर प्रतिनियुक्तीवरील अधिकार्‍यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली असून, महापालिकेतील अधिकार्‍यांना सेवाजेष्ठतेनुसार जाणीवपूर्वक  डावलण्यात येत असल्याचा आरोप समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी केला आहे. 
महापालिका आस्थापनेवर सहायक आयुक्त (सामूहिक विकास) व समाज विकास अधिकारी या दोन पदांची निर्मिती केली आहे. 1 डिसेंबर 1989 अन्वये नागरवस्तीच्या दोन्ही पदांस शासनाने मंजुरी दिली आहे. 

या निर्णयानुसार महापालिकेच्या  प्रशासनाने समाज विकास आधिकारी हे पद भरले आहे, तर सहायक आयुक्त या अभिमानाचे एक पद कित्येक  वर्षांपासून भरलेले नाही. या पदासाठी एमएसडब्ल्यू ही शैक्षणिक पात्रता आहे. हे पद भरले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सहायक आयुक्त ठराव क्रमांक 913 नुसार संभाजी ऐवले यांना पदोन्नती देण्यात आली आहे. 

यामध्ये त्यांची शैक्षणिक आर्हता व सेवाजेष्ठता आणि गोपनीय अहवाल आदींचा तपशील विचारात घेऊन त्यांना बढती देण्याच्या  ठरावास सर्वानुमते मान्यता दिली आहे.पदोन्नती देण्यास डावलले जात आहे, असे ऐवले यांनी सांगितले. त्या पदावर पदोन्नती मिळावी म्हणून समाज विकास अधिकार ऐवले यांनी महापालिका आयुक्त, कर्मचारी महासंघ व निदेशक राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांच्याकडे मागणी केली आहे.