Fri, Apr 26, 2019 00:04होमपेज › Pune › अखेर कुणाल कुमार झाले पदमुक्‍त; दिल्लीमध्ये रुजू

अखेर कुणाल कुमार झाले पदमुक्‍त; दिल्लीमध्ये रुजू

Published On: Apr 07 2018 1:55AM | Last Updated: Apr 07 2018 1:51AMपुणे : प्रतिनिधी

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी अखेर शुक्रवारी आयुक्तपदाचा पदभार सोडला. त्यानंतर त्यांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी, म्हणजेच दिल्लीत केंद्रिय नगरविकास खात्याच्या सहसचिवपदाचा कार्यभार स्विकारला. 

महापालिकेत तब्बल पावणेचार वर्ष आयुक्तपदी राहिलेल्या कुणाल कुमार यांच्या बढतीची गेल्या महिन्यात 12 मार्चला ऑर्डर निघाली; मात्र, राज्य शासनाकडून त्यांना पालिकेच्या सेवेतून मुक्त करण्यात आले नव्हते, त्यामुळे ते आयुक्तपदावर कायम होते. गुरूवारी सायंकाळी नगरविकास खात्याने त्यांना पालिका सेवेतून मुक्त करण्याचे आदेश काढले. त्यानुसार कुमार यांनी शुक्रवारी त्यांच्या पदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांच्याकडे सोपवत ते पालिकेतून पदमुक्त झाले.

नविन आयुक्त कोण येणार

कुणाल कुमार हे आयुक्तपदावरून मुक्त झाल्याने आता नविन आयुक्त कोण येणार याची चर्चा रंगली आहे. चर्चेमध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. यशिवाय अन्य नावांवर चर्चा सुरू असून, पुढील आठवड्यात यासंबधीचे चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.

 

Tags : pune, pune news, pune municipal corporation, Commissioner Kunal Kumar resign,