Fri, Apr 26, 2019 17:55होमपेज › Pune › जलवाहतूक योजनेत मुळा-मुठाचा होणार समावेश

जलवाहतूक योजनेत मुळा-मुठाचा होणार समावेश

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक योजनेमध्ये शहरातील मुळा आणि मुठा या नद्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘द नॅशनल वॉटरवेज बिल -2015’ च्या मूळ प्रस्तावात बदल करून मुळा-मुठा नद्यांच्या नावाचा समावेश करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

खासदार अनिल शिरोळे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारने देशामध्ये अंतर्गत जलवाहतूकीला चालना मिळावी यासाठी 2015 मध्ये विधेयक मंजूर केले आहे. त्यानुसार शहरातील शंभराहून अधिक नद्यांमध्ये जलवाहतूक केली जाणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणार्‍या मुळा आणि मुठा या नद्यांचा समावेश यामध्ये करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गतवर्षी केली होती. त्यानंतर राज्य शासनाने यासंबधीचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री यांच्याकडे पाठवला होता. 

दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात ‘द नॅशनल वॉटरवेज बिल -2015’ च्या मूळ प्रस्तावात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात अधिवेशनाच्या काळात गडकरी यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली असून, मूळ प्रस्तावात मुळा आणि मुठा नद्यांचा समावेश करण्याचे आदेश संबधित अधिकार्‍यांना दिले आहेत. या प्रकल्पामुळे पुण्याला आणखी एक सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय उपलब्ध होणार असून, खडकवासला ते खराडी या दरम्यान हा प्रकल्प संयुक्तिक ठरेल, असे खासदार शिरोळे यांनी सांगितले.

 

Tags : pune, pune news, Water Transport Scheme, Mula Mutha, included,


  •