Mon, Jan 21, 2019 15:07होमपेज › Pune › पुण्यात ९ ऑगस्टला आंदोलन; मराठा क्रांती मोर्चा संयोजक (व्हिडिओ)

पुण्यात ९ ऑगस्टला आंदोलन; मराठा क्रांती मोर्चा संयोजक (व्हिडिओ) 

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 07 2018 6:43PMपुणे : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्‍ट्रात ९ ऑगस्‍ट रोजी मराठा सामाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंद पाळण्यात येणार आहे. मात्र, पुण्यात या दिवशी बंद न पाळता आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्हा संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी त्‍यांनी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन केले. संयोजकांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ‘‘ ९ ऑगस्‍ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल. तसेच जिल्‍ह्यात या दिवशी बंद पाळण्यात येणार नसला तरी, कोणी उत्स्फूर्त बंद पाळला तर त्याला आमचा विरोध नाही, अशी भूमिकाही संयोजकांनी यावेळी जाहीर केली.