Sun, Apr 21, 2019 00:33होमपेज › Pune › पीएमपीचे पिंपरी कार्यालय सुरू करण्यासाठी हालचाली

पीएमपीचे पिंपरी कार्यालय सुरू करण्यासाठी हालचाली

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 29 2018 11:00PMपुणे : प्रतिनिधी 

पीएमपीचे पिंपरी येथील बंद करण्यात आलेले विभागीय कार्यालय पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी व्यवस्थापन आराखड्यासाठी मागील अनेक वर्षापासून सुरू असलेले विभागीय कार्यालय अचानक बंद केले होते. हे कार्यालय बंद केल्यामुळे या भागातील पीएमपीचे अधिकारी, कार्यालयात काम करणारे कर्मचार्‍यांची इतरत्र बदली करण्यात आली. तसेच कार्यालय बंद केल्यामुळे या भागातील पीएमपीचा सर्व कारभारच विस्कळीत झाला. मुंढे यांची बदली झाल्यानंतर मागील दोन ते अडीच महिन्यांपासून हे कार्यालय सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र त्यास पाहिजे, असे यश मिळाले नाही. मागील आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विभागीय कार्यालय सुरू करण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर प्रशासकीय पातळीवर आता हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार कागदपत्रे, कर्मचार्‍यांच्या नेमणूका,याबबत चाचपणी प्रशासनाने सुरू केली आहे.