Sun, Jul 21, 2019 05:55होमपेज › Pune › अनोखी सायकल रॅली काढून मदर्स डे साजरा

अनोखी सायकल रॅली काढून मदर्स डे साजरा

Published On: May 14 2018 1:55AM | Last Updated: May 14 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी

मातृत्वाला अभिवादन करण्यासाठी स्टारकेन स्पोर्ट्स तर्फे मदर्स डेनिमित्त एका अनोख्या सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅली अंतर्गत स्टारकेन स्पोर्ट्स ने 23 किमी ची रॅली काढली आणि रॅली नंतर खराडी येथील अप्पासाहेब वृद्धाश्रमातील वृध्दांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. या रॅली नंतर सहभागी झालेले सर्वजण वृद्धाश्रमातील महिलांना भेटले, त्यांना मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या, त्यांच्यासोबत केक कापून मदर्स डे साजरा केला आणि शेवटी सर्व सदस्यांना अत्यावश्यक वस्तू जसे कि अन्न पदार्थ, प्राथमिक औषधे, कडधान्ये इत्यादी गोष्टींचे वाटप केले. शहरातील विविध क्षेत्रातील आणि भागातील लोकांनी  या रॅलीत सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यह्या 23 किमी सायकल रॅलीला सकाळी 6.30 वाजता शिवाजी नगर येथून सुरुवात झाली. 

विविध  वयोगटातील 100 हून अधिक जणांनी या सायकल रॅलीत सहभागी घेतला होता. या प्रसंगी बोलताना स्टारकेनचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण पाटील म्हणाले, आम्ही हा मदर्स डे सायकल रॅली काढून आणि वृद्धाश्रमाला भेट देऊन साजरा करण्याचे ठरवले. वृद्धाश्रमात देखील असंख्य वृद्ध महिला असतात आणि अशा पैकीच काहींसोबत वेळ घालवणे, त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे हा आमचा मुख्य उद्देश होता. या रॅलीला मिळालेल्या उत्सफुर्त प्रतिसादावरुन यापुढे दरवर्षी अशा प्रकारची रॅली काढण्यात येतील.