Fri, Apr 10, 2020 17:19होमपेज › Pune › ७० वर्षीय आईची मुलाकडून हत्या

७० वर्षीय आईची मुलाकडून हत्या

Published On: Dec 09 2017 1:45AM | Last Updated: Dec 09 2017 12:54AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

झोपेतील आई-वडिलांचा खून केल्याची घटना ताजी असताना जागेची कागदपत्रे द्यावीत, या कारणावरून 70 वर्षीय आईचा मुलानेच खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी एरंडवण्यातील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये उघडकीस आली. 

अरुणा मनोहर सपकाळ असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगा आनंद मनोहर सपकाळ (43, ओटा वसाहत, गणेशनगर एरंडवणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गेल्या तीन दिवसांत अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.