Sun, Mar 24, 2019 22:59
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › मनोरुग्ण मुलाकडून आईचा भीषण खून

मनोरुग्ण मुलाकडून आईचा भीषण खून

Published On: Mar 01 2018 2:01AM | Last Updated: Mar 01 2018 12:34AMइंदोरी : वार्ताहर 

मावळातील माळवडी येथे मुलाने आपल्या आईचा गॅस सिलिंडरची टाकी डोक्यात घालून खून केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.27) रात्री उशिरा शितळादेवी मंदिरासमोर घडली. किरकोळ भांडणाचा राग मनात धरल्याने मनोरुग्ण मुलाकडून हे दुष्कृत्य घडल्याचे समजते. 

मीना बाळासाहेब दाभाडे (55, शितळादेवी मंदिरशेजारी माळवाडी, ता. मावळ) असे या मयत महिलेचे नाव आहे. तर राम बाळासाहेब दाभाडे (27, माळवाडी शितळादेवी मंदिरशेजारी ता. मावळ) असे आरोपी मुलाचे नाव आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी मयत मीना यांचे दीर शांताराम सीताराम दाभाडे (65, माळवाडी शितळादेवी मंदिर शेजारी ता. जि. पुणे) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राम दाभाडे हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर येरवडा येथे उपचार सुरू होते. आठ दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. तो वेडसर असल्याने मंगळवारी रात्रीच्या  सुमारास घरातील किरकोळ भांडणाच्या कारणावरून राग येऊन त्याने आई मीना हिच्या डोक्यात गॅस सिलिंडरची टाकी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मीना यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले पुढील तपास करीत आहेत.