Tue, Jan 22, 2019 10:20होमपेज › Pune › आईने दिला मुलीला दुस-यांदा ‘जन्म’

आईने दिला मुलीला दुस-यांदा ‘जन्म’

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 18 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी

आईनेच मुलीला मुत्रपिंड दान करून जण् काही तिला पुन्हा एकदा नवीन जीवन दिले आहे. शुक्रवारी सकाळी ससून रुग्णालयात ही मुत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. ससूनमधील हे जिवंत दाता असलेले पाचवे तर एकुण नववे मूत्रपिंड प्रत्यारोपण ठरले आहे.मुत्रपिंड प्रत्यारोपण झालेली 42 वर्षीय रुग्ण महिला ही पाषाण येथील रहिवाशी आहे. ती ‘क्रॉनिक’ किडनी आजाराने ग्रस्त होती. त्यामुळे गेल्या 9 महिन्यापासून डायलिसिस उपचार घेत होती. आरोग्य भारतीच्या शिबिरातून ससूनला उपचारासाठी ही महिला दाखल झाली. तज्ज्ञ डॉक्टरांनी तिला मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला असता तिच्या 58 वर्षीय आईने तिचे मूत्रपिंड दानाकरिता संमती दर्शविली. 

गृहिणी असलेल्या रुग्ण महिलेचे पती शिपाई म्हणून काम करतात. तर दोन्ही मुलांचे शिक्षण सूरू आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.  ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, कुशल वैद्यकीय तज्ज्ञ व अत्याधुनिक उपकरणांनी ससून सुसज्ज होत असल्यामुळे या शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. या मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. अभय सदरे, डॉ. गोविंद कासट, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. धनेश कामेरकर, भूलतज्ञ डॉ. विद्या केळकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी यांचा समावेश होता. तसेच अधिसेविका राजश्री कोरके व सिस्टर रुखसाना सय्यद यांनी मोलाचे सहकार्य केले.