Thu, Nov 14, 2019 07:50होमपेज › Pune › कोकण, मध्य महाराष्ट्रात चार दिवस जोरदार पावसाची शक्यता 

बहुतांश राज्य मान्सूनने व्यापले

Published On: Jun 24 2019 4:11PM | Last Updated: Jun 24 2019 3:58PM
पुणे : प्रतिनिधी

नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) सोमवारी राज्याचा बहुतांश भाग व्यापला. कोकणातील अलिबाग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, मालेगाव येथे मोसमी वारे दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

मान्सून मध्य अरबी समुद्राचा बहुतांश भाग, कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, मराठवाडा व विदर्भाचा उर्वरित भाग, मध्य प्रदेश व छत्तीसगडचा काही भाग येथेपर्यंत सोमवारी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. येत्या 24 तासात राज्याचा उर्वरित भाग, मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, दक्षिण गुजरातचा काही भाग, मध्य प्रदेशचा काही भाग, उत्तर प्रदेश व उत्तराखंडचा बहुतांश भाग येथे मान्सून डेरेदाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.