Tue, Apr 23, 2019 06:38होमपेज › Pune › पुण्‍यात मराठा समाजाचा आरक्षणासाठी एल्गार

पुण्‍यात मराठा समाजाचा आरक्षणासाठी एल्गार 

Published On: Jul 29 2018 12:23PM | Last Updated: Jul 29 2018 2:38PMपुणे:  प्रतिनिधी 

 मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठवड्याभरापासून राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.  आज पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली असून शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर मागण्यांचे निवेदन ठेवून समारोप होणार आहे.

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणीने नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.त्यानंतर जगन्नाथ सोनवणे यांनी देखील विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.या सर्व घटनानंतर राज्यातील मराठा समाजाने ठिकठिकाणी तीव्र आंदोलन केले.अनेक ठिकाणी बस फोडण्याच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आज पुण्यात डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साडे अकरा वाजता सुरुवात झाली. त्यानंतर पुढे बालगंधर्व रंगमंदिर चौक,  पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूने पुढे शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या येथे समारोप होणार आहे. 

मोर्चास सुरुवात झाली असून शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर मागण्यांचे निवेदन ठेवून समारोप झाला. मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या मराठा बांधवाना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन ही करण्यात येणार आहे.

 या मोर्चा दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी देण्यात येत.तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये.यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.