Tue, Nov 20, 2018 13:10होमपेज › Pune › जपानमध्ये उभारणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक

जपानमध्ये उभारणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 07 2018 11:25PMपुणे : प्रतिनिधी

इंडो जॅपनिज फाऊंडेशन फॉर कल्चरल एक्सचेन्ज अँड वर्ल्ड पिस संस्थेच्या वतीने, जपानधील निको शहराजवळ नेताजी सुभाषचंद बोस यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. 
दोन एकर जागेमध्ये सुमारे 12 ते 15 कोटी रुपये खर्चुन हे स्मारक साकार होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी, जपानचे तोशिमित्सु सयामा व शिरीष केंभावी आदी यावेळी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, या प्रकल्पामध्ये जागतिक शांततेचे स्मारक उभे करण्यात येणार आहे. येथील रहिवासी आकुच नूरीमासा यांनी दिलेल्या 2 एकर जागेत स्मारक, शांतिगार्डन व म्युझियम साकारले जाणार आहे. 

जपानची पुर्वीची राजधानी असलेल्या निको शहारालगतच्या गावात हे स्मारक तयार करण्यात येणार आहे. जागतिक हेरिटेज असलेल्या या शहरास दरवर्षी जवळपास 70 लाख पर्यटक भेट देतात. याठिकाणी बोस यांचे स्मारक उभे राहिल्यास संपूर्ण जगाला बोस यांच्या जीवनचरित्राची ओळख होईल, असेही त्यांनी सांगितले.