Sat, Feb 16, 2019 18:51होमपेज › Pune › मान्सून केरळाच्या वेशीवर

मान्सून केरळाच्या वेशीवर

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 28 2018 12:38AMपुणे : प्रतिनिधी

येत्या 24 तासांत केरळचा काही भाग, दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन, तामिळनाडूचा काही भाग येथे नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पोहोचण्यास अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मान्सून वेळापत्रकाच्या तब्बल चार दिवस अगोदर केरळात दाखल होत असला तरीदेखील राज्यात तो वेळापत्रकानुसार म्हणजेच 7 ते 10 जूनच्या दरम्यान पोहोचेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. दरम्यान, विदर्भात रविवारीदेखील उष्णतेची लाट कायम होती.