Thu, Jul 18, 2019 08:04होमपेज › Pune › पुन्हा पावसाने झोडपले

पुन्हा पावसाने झोडपले

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 07 2018 12:08AMपिंपरी : प्रतिनिधी

शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाने शहराला झोडपल्यानंतर बुधवार (दि.6) सायंकाळी पाचच्या सुमारास पुन्हा पावसाने झोडपले. यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली तर मुख्य रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. दरम्यान, पाचनंतर आलेल्या पावसाने नोकरदारांची धांदल उडाली तर ग्रेडसेपरेटरमध्ये नागरिकांनी पादचारी पुलाखाली आश्रय घेतल्याने पुन्हा वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, पुलाखाली पाणी साचले. 

तासभर चाललेल्या पावसाने विविध भागात रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते. यावेळी मान्सूनची चाहूल लागल्याने चाकरमानी पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्ण तयारीत असल्याचे दिसून आले तर अचानक आलेल्या पावसाने मात्र काहींची  धांंदल उडाली. काही काळ आलेल्या या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यावेळी नागरिकांनी चमचमीत पदार्थांवर ताव मारला.